जाहीर करावयाचे पदार्थ (Items to declare – Marathi)

आमच्या आंतरराष्ट्रीय सीमांवर घातक कीटक व रोग यांच्या आयातीवर प्रतिबंध घालण्यासाठी (ज्याला आम्ही “जैवसुरक्षा” असे म्हणतो) न्यूझीलँड मध्ये अत्यंत कठोर नियमावली आहे. यामुळे न्युझीलँड काही विशिष्ट पदार्थ देशामध्ये आणण्यास अनुमती देत नाही. ‘काय आणणे अमान्य आहे’ हे जाणण्यासाठी व 400 डॉलरचा दंड टाळण्यासाठी हे तपासा.

‘न्यूझीलंडमध्ये काय आणणे मान्य आहे’ याबद्दल आमच्याकडे कायदे का आहेत

न्यूझीलंडमध्ये नैसर्गिक वातावरण आहे जे जगभर प्रसिद्ध आहे आणि आमची भूमी ही बागकाम आणि कृषीविषयक उद्योगांची भूमी आहे. आम्ही जगभरातून आयात करतो. न्यूझीलंडचे अतिथी म्हणून आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो की आमच्या देशाला कीटक व रोगांपासून वाचवण्यासाठी तुम्ही तुमची भूमिका पार पाडावी. तुम्हाला ‘देशात काय आणणे मान्य आहे’ यासंबंधीचा कायदा पाळावा लागेल. तुम्ही केवळ सोबत आणलेले पदार्थ तुमच्या प्रवासी आगमन पत्रकावर जाहीर करून जैव संरक्षण कर्मचाऱ्या समोर परीक्षणासाठी सादर करा. कोणताही प्रतिबंधित पदार्थ तुमच्याकडून काढून घेतला जाईल. हे करत असताना आम्ही तुम्हाला खात्री देऊ की तुम्हाला पुढे कमीत कमी 400 NZD च्या दंडाला सामोरे जावे लागणार नाही.

प्रतिबंधित पदार्थ

काही पदार्थांबद्दलचा निर्णय त्यांच्या पॅकिंग व प्रक्रिया यावर आधारित असला तरी काही पदार्थ असे आहेत जे तुम्ही आणूच शकत नाही. त्यामध्ये खालील पदार्थांचा समावेश होतो :

  • ताजी फळे व पालेभाज्या
  • फुले व बिया (प्रसादाचे पदार्थसुद्धा)
  • ताजे मांस किंवा मासे
  • धान्य आणि डाळी
  • मध व मधमाशां-पासून बनणारे पदार्थ
  • आरोग्यवर्धक औषधे (च्यवनप्राश सहित)

जर तुम्ही हे पदार्थ आणण्याच्या बेतात असाल तर कृपया ते घरीच ठेवा. प्रत्येक पदार्थ जो तुम्ही आणाल तो जैवसंरक्षण कर्मचाऱ्याला दर्शित करणे आवश्यक आहे किंवा तो पदार्थ तुम्ही विमानतळावर आल्यावर चिन्हांकित कुंड्यांमध्ये नष्ट करणे गरजेचे आहे. जर तुम्ही सोबत आणलेल्या सर्व वस्तू दाखविल्या नाहीत तर तुम्हाला दंड केला जाईल व पदार्थ जप्त केले जातील.

तुम्ही भारतीय मिठाई आणि वेफर्स आणू शकता. ते प्रतिबंधित नाहीत. परंतु खात्री करा की ते तुम्ही  तुमच्या आगमनाच्या वेळी पदार्थ वेगळे करणाऱ्या अधिकाऱ्यासमोर दाखवले आहेत.

प्रतिबंधित नसले तरी सुद्धा गिर्यारोहण, खेळ व कॅम्पिंग-संबंधी साहित्याचे परीक्षण करणे आवश्यक आहे. या प्रकारच्या साहित्यातून माती किंवा झाडाचे कण इतर देशांमधून न्यूझीलंडमध्ये येऊ शकतात. ज्यामध्ये कीटक, रोग किंवा बिया असू शकतात व ते आमच्या पर्यावरणाला व वन्य-जीवनाला घातक ठरू शकतात.

प्रवासी आगमन पत्रक भरणे

न्यूझीलँड मध्ये येणाऱ्या सर्व प्रवाशांना प्रवासी पत्रक भरणे आवश्यक आहे.

त्या प्रवासी आगमन पत्रकावर जैवसंरक्षण पदार्थांबद्दल प्रश्न आहेत. तुम्ही सोबत आणलेले पदार्थ प्रामाणिकपणे प्रवासी आगमन पत्रकावर दर्शित करणे बंधनकारक आहे. जेणे-करून आम्ही हे तपासू शकतो की ते न्यूझीलँड ला घातक आहेत का? जर तुमच्याकडे दर्शित न केलेला जैवसंरक्षण विषयक पदार्थ आढळला तर तुमच्याकडून कमीत कमी $400NZD दंड आकारला जाईल.

जेव्हा तुम्ही घातक पदार्थ असल्याचे जाहीर करता तेव्हा काय घडते?

पदार्थ वेगळे करणारा अधिकारी तुम्हाला अधिक प्रश्न विचारून, पदार्थाचे निरीक्षण करून जाहीर केलेला पदार्थ हाताळतो. तुम्ही घातक म्हणून जाहीर केलेला पदार्थ कदाचित आमच्या देशात मान्य-सुद्धा असू शकतो:

  • जर जैवसंरक्षण अधिकारी ‘तुमचा पदार्थ घातक नाही’ याबद्दल संतुष्ट असेल तर
  • जर सीमेवर त्यांच्यावर आमच्याद्वारे योग्य प्रकारे प्रक्रिया केल्या गेल्या असतील तर

तरीही काही पदार्थ असे असू शकतात जे कोणत्याच परिस्थितीत देशात घेऊन जाण्यास मान्य नाहीत. ते एक तर जप्त केले जातील किंवा नष्ट केले जातील.

ज्या पदार्थांवर काही प्रक्रिया करणे आवश्यक आहे ते स्वतंत्रपणे खाजगी प्रक्रिया कंपनीकडे पाठवले जातात. प्रक्रियेसाठी पाठवलेले पदार्थ तुम्ही नंतर घेऊ शकता, परंतु त्यावर शुल्क आकारले जाऊ शकते याची नोंद घ्यावी.

जर तुम्ही जाहीर न केलेल्या जैवसुरक्षेसंबंधी पदार्थां-सहित आढळलात तर तुम्हाला ताबडतोब कमीत कमी 400 डॉलरचा दंड आकारला जाईल.

तुम्ही न्यूझीलंडमध्ये अनेक भारतीय उत्पादने विकत घेऊ शकता

न्यूझीलंडमध्ये विशेष सुपर मार्केट आणि दुकाने आहेत जेथे अनेक भारतीय खाद्यपदार्थ तयार स्वरुपात उपलब्ध असतात. तुम्ही इंटरनेट वर न्यूझीलंडमध्ये भारतीय खाद्य पदार्थ विकणारे दुकान सहज शोधू शकता. आम्ही तुमच्या सुविधेसाठी यादी बनवली आहे ज्यामध्ये न्यूझीलंड-मधल्या प्रमुख शहरातील दुकानांची नावे आहेत :

न्यूझीलंडमध्ये भारतीय सुपरमार्केट [PDF, 504 KB]

अधिक माहिती करिता

‘आपण न्यूझीलंडमध्ये काय नेऊ शकतो’ याबद्दल जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही info@mpi.govt.nz वर ईमेल करा.

 

Last reviewed: